विषय समित्यांची अविरोध निवड

By Admin | Updated: December 4, 2015 02:44 IST2015-12-04T02:44:25+5:302015-12-04T02:44:25+5:30

मोताळा नगरपंचायत स्थायी समिती निवडणूक.

Unconditional choice of subject societies | विषय समित्यांची अविरोध निवड

विषय समित्यांची अविरोध निवड

मोताळा (जि. बुलडाणा) : नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीनंतर आज ३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात विविध विषय समित्यांच्याचे सभपती व स्थायी समितीची निवड करण्यात आली. येथील नगर पंचायतीमध्ये बहुमत असल्यामुळे सर्व सभापती व स्थायी समिती अविरोध निवडून आली. मोताळा नगरपंचायतमधील विषय समिती व स्थायी समितीवर सदस्य नामनिर्देशनकरिता व सभापती पदाच्या निवडणुकीकरिता तहसील कार्यालयात गुरुवारी निर्वाचित सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शैलेंद्र चव्हाण हे होते. सभेमध्ये प्रत्येक विषय समितीकरिता एकच उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाल्यामुळे बांधकाम समीतीच्या सभापतीपदी शेख सलीम शेख करीम, शिक्षण समितीच्या सभापतीपदी शेख सलीम शेख बशीर, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सभापतीपदी सोपान शेषराव धोरण, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी हसमतबी जलीलखाँ तर उपसभापतीपदी जायदाबी शेख मुसा यांची एकमताने निवड करण्यात आली.

Web Title: Unconditional choice of subject societies