शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

खामगाव: अनधिकृत स्थलांतरीत शाळा जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:46 IST

शिक्षण विभागाच्या चौकशीनंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ही शाळा हलविली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थलांतरासाठी शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता तब्बल अडीच महिन्यांपासून खामगाव शहरात इंग्रजी माध्यमाची एक अनधिकृत शाळा चालविण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीनंतरही संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने ही शाळा हलविली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. दीपावलीच्या सुटीनंतर पुन्हा ही शाळा भाड्याच्या जागेतच सुरू होती.शहरातील टिचर कॉलनीत १ सप्टेंबर २०१९ पासून मांऊट सिनाई ही शाळा अनधिकृतपणे चालविली जात असल्याची तक्रार शहर पोलिसात झाली होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेही अनुषंगीक तक्रार झाली होती. खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी २३ सप्टेंबर रोजी पाहणी केली. शाळेच्या भेटीच्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत पटावरील १६३ पैकी १४१ विद्यार्थी हजर होते. दरम्यान, शाळेला मान्यता मिळालेल्या ठिकाणाऐवजी शहरात अनधिकृतपणे ही शाळा चालविली जात होती. तसा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.शिक्षण विभागाच्या तपासणीनंतरही शाळा भाड्याच्याच खोलीत!मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा चक्क एका भाड्याच्या इमारतीत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून या शाळेची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, केवळ आठ-दहा दिवसांसाठी ही शाळा तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आल्याचे संबंधितांनी नमूद केले. मात्र, त्यानंतर दीपावलीच्या सुटी लागल्या. या सुटीनंतरही ही शाळा भाड्याच्याच इमारतीत सुरू असल्याचे गुरूवारी दिसून आले.

टिचर कॉलनीतील एका इमारतीत मांऊट सिनाई ही शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून या शाळेची चौकशी करण्यात आली आहे. दीपावलीच्या सुटीत बंद असलेली ही शाळा आता पुन्हा त्याच इमारतीत सुरू झाली आहे.- मो. इमरान मो. इकबालतक्रारकर्ते, टिचर कॉलनी

मान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू नाही. दोन सदस्यीय समितीमार्फत या शाळेची चौकशी करण्यात आली. शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, ही शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात आली आहे. या शाळेला शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडून परवनागीचे आदेश प्राप्त नाहीत.- गजानन गायकवाड गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळा