बुलडाणा : बुलडाण्याची लेक पुनम दिनकर सोनुने हिने श्रीलंका देशातील कोलंबो येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.बुलडाणा शहरापासून काही अंतकरावर असलेला सागवन या ग्रामीण भागातील पुनक दिनकर सोनुने हिने श्रीलंका देशातील कोलंबो येथे ६ मे रोजी पार पडलेल्या स्पर्धेत यश मिळविले आहे. कोलंबो येथे साऊथ एशियन ज्युनिअर अॅथलॅटीक्स चॅम्पीयन-२०१८ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एशियातील एकूण ८ देश सहभागी झाले होते. त्यात बुलडाणा तालुक्यातील सागवन येथील रहिवासी व भोसला मिलीटरी स्कुल नाशिकची विद्यार्थींनी पुनम दिनकर सोनुने हिने ३ किलो मिटर व दीड किलोमिटर स्पर्धेत सहभागी होवून इतर देशातील स्पर्धकांवर मात करून प्रथम येत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बुलडाण्याच्या लेकीला कोलंबोत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 18:06 IST
बुलडाणा : बुलडाण्याची लेक पुनम दिनकर सोनुने हिने श्रीलंका देशातील कोलंबो येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.
बुलडाण्याच्या लेकीला कोलंबोत सुवर्णपदक
ठळक मुद्देकोलंबो येथे साऊथ एशियन ज्युनिअर अॅथलॅटीक्स चॅम्पीयन-२०१८ स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत एशियातील एकूण ८ देश सहभागी झाले होते. सागवन या ग्रामीण भागातील पुनक दिनकर सोनुने हिने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.