पैनगंगा नदीच्या पुरात वाहून दोन युवक बेपत्ता
By Admin | Updated: October 1, 2016 15:48 IST2016-10-01T15:48:35+5:302016-10-01T15:48:35+5:30
पैनगंगा नदीला आलेल्या पुरात तीन युवक वाहून गेल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.

पैनगंगा नदीच्या पुरात वाहून दोन युवक बेपत्ता
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १ - पैनगंगा नदीला आलेल्या पुरात तीन युवक वाहून गेल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. तालुक्यातील पळसखेड नाईक येथील पुलावरून पाय घसरल्यामुळे हे तीन युवक प्रवाहात ओढले गेले. या युवकांपैकी १ युवकाला वाचविण्यात यश आले असून बेपत्ता दोघांचा शोध सुरू आहे. सदर युवक हे बुलडाणा शहरातील इंदिरा नगरातील रहिवासी आहेत.