वेगवेगळ्या घटनेत दोन युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: October 26, 2014 23:51 IST2014-10-26T23:51:23+5:302014-10-26T23:51:23+5:30
बुलडाणा व मातोळा तालुक्यातील दोन युवकांची आत्महत्या.

वेगवेगळ्या घटनेत दोन युवकाची आत्महत्या
बुलडाणा : तालुक्यातील कोलवड परिसरात एका शेतकरीपुत्राने तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज रविवारी घडल्या. बुलडाणा तालुक्यातील कोलवड परिसरातील सागवन रस्त्यावर रवींद्र रामदास जाधव (२५) हा अत्यवस्थ स्थितीत आढळला. या मार्गाने जात असलेले नवनिर्वाचित आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गाडी थांबवून रवींद्रला अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दा खल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील २२ वर्षीय दुर्गादास विश्वनाथ सातव याने सुलतानपूर शिवारातील शर्मा यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गादास हा शेजमजुरीचे काम करीत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.