बुलडाणा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी पहाटे पावणे सहा वाजताच्या दरम्यान बुलडाणा- अजिंठा मार्गावरील दत्त मंदिराजवळ घडली. स्थानिक मुठ्ठे - ले- आऊटमधील हिराबाई ज्ञानदेव आगाशे (वय ६७ ) व आशाबाई अनिल व्यवहारे ( वय ६०) या दोघी सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. धाक नाक्याजवळील दत्त मंदिराजवळ त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. रस्त्याने जाणाºया नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अज्ञात वाहनाचा चालक वाहनासह फरार झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुठ्ठे ले - आऊटमधील शिक्षक स्वप्नील काळवाघे यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:46 IST
बुलडाणा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी पहाटे पावणे सहा वाजताच्या दरम्यान बुलडाणा- अजिंठा मार्गावरील दत्त मंदिराजवळ घडली.
'मॉर्निंग वॉक'ला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले
ठळक मुद्दे हिराबाई ज्ञानदेव आगाशे व आशाबाई अनिल व्यवहारे या दोघी सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. दत्त मंदिराजवळ त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.