वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: February 4, 2016 01:40 IST2016-02-04T01:40:04+5:302016-02-04T01:40:04+5:30

मलकापूर नजीकची घटना.

Two wheelers killed in the vehicle | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मलकापूर (जि. बुलडाणा) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने २३ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मुंधडा पेट्रोल पंपानजीक घडली. पान्हेरा येथील विकास राजेंद्र तायडे हा युवक एमएच-२८-एच-९७३३ क्रमांकाच्या दुचाकीने मलकापूर येथून पान्हेराकडे जात असताना मुंधडा पेट्रोलपंपानजीक त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात विकास गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मलकापूर येथील आत्माराम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू करीत आहेत.

Web Title: Two wheelers killed in the vehicle