वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: August 28, 2016 23:27 IST2016-08-28T23:27:46+5:302016-08-28T23:27:46+5:30
अज्ञात वाहनाने दिली धडक; जालना-सिंदखेडमार्गावर झाला अपघात.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिंदखेडराजा(जि. बुलडाणा),दि. २८: येथील फिल्टर प्लँटजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी रात्रीदरम्यान घडली.
तालुक्यातील राहेरी येथील लिंबाजी परसराम परसने (२७) हे औरंगाबादवरून सिंदखेडराजाला मोटारसायकलने येत असताना फिल्टर प्लँटजवळ त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असता त्यांना जालना येथे उपचारासाठी नेण्यात आले; परंतु उ पचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात २८ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करण्यात आले.