अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: May 17, 2017 14:07 IST2017-05-17T14:07:31+5:302017-05-17T14:07:31+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
खामगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना शेगावनजीक दुर्गा देवी मंदिराजवळ मंगळवारी रात्री घडली. शेगाव येथील व्यंकटेश नगरातील रहिवासी अजाबराव सूर्यभान वाघ (वय ५०) व रामेश्वर भोजने हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२८ -८२२६ ने जात असताना उपरोक्त ठिकाणी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये अजाबराव वाघ हे ठार झाले तर दुचाकीस्वार रामेश्वर भोजने हे गंभीर जखमी झाले. रामेश्वर भोजने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक अजाबराव वाघ यांच्या पश्चात २ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे. या अपघातप्रकरणी शेगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.