दुचाकीची ट्रक्टरला धडक, २ जखमी

By Admin | Updated: October 21, 2014 23:57 IST2014-10-21T23:57:47+5:302014-10-21T23:57:47+5:30

मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक; राज्य महामार्गावर नागापूर जवळील घटना.

Two wheelers hit two tractors, two injured | दुचाकीची ट्रक्टरला धडक, २ जखमी

दुचाकीची ट्रक्टरला धडक, २ जखमी

डोणगाव (बुलडाणा) : येथून जवळच राज्य महामार्गावर नागापूर जवळील वळणावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २१ ऑ क्टोबर रोजी सकाळी १0.४५ वाजताच्या दरम्यान घडली. डोणगाव येथील कुंडलीक दांदडे व कमलबाई दांदडे हे मेहकरकडे एम.एच.२८ बी.५ - ४११ क्रमांकाच्या त्यांच्या दुचाकीने जात होते. दरम्यान समोरुन येणार्‍या एम. एच.४३ - यु - ९८७६ क्रमांकाच्या आयशर गाडीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील कुंडलिक दांदडे (५८) व कमलबाई दांदडे (५५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मेहकर येथे हलविण्यात आले आहे. या मार्गावर अपघा ताचे प्रमाण वाढते असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

Web Title: Two wheelers hit two tractors, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.