दुचाकी-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी
By Admin | Updated: November 30, 2014 23:07 IST2014-11-30T23:07:57+5:302014-11-30T23:07:57+5:30
साखरखेर्डा-लव्हाळा मार्गावर अपघात.

दुचाकी-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी
साखरखेर्डा ( बुलडाणा) : साखरखेर्डा-लव्हाळा रोडवर मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची समारोसमोर धडक होऊन या अपघातात केंद्रीय राखीव दलाचा सैनिक जागीच ठार झाला असून, त्याचा मावसभाऊ गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, वरोडी यात्रेवरून परत नायगाव बु. येथे मोटारसायकल एमएच १४ ए.टी.५७५१ ने केंद्रीय राखीव दलाचा सैनिक सुधीर प्रेमसिंग जैंजाळ आणि त्याचा मावसभाऊ योगेश भगवान काकडे रा. कवठळ हे दोघे रात्री ७.३0 च्या सुमारास परत जात असताना सवडद फाट्यानजीक मोटारसायकल आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. यात केंद्रीय राखीव दलाचा सैनिक सुधीर जैंजाळ हा जागीच ठार झाला. तो सिक्कीम येथे कार्यरत होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाने नायगाव बु. येथे शोककळा पसरली. ट्रॅक्टर मालक ज्ञानेश्वर आराख रा. सवडद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती साखरखेर्डा पोलिसांनी दिली.