भरधाव मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:57 AM2020-07-25T11:57:18+5:302020-07-25T11:57:39+5:30

भरधाव मालवाहूच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला.

Two-wheeler rider killed in accident at khamgaon | भरधाव मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव - भरधाव मालवाहूच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चिखली रोडवारील माथणी फाट्यावर घडली.
चिखली रोडवरील माथणी येथील रहिवाशी मोहम्मद वसीम मो. जियाउल्ला हा ७ जुलै रोजी रात्री ११.३० वा. दरम्यान दुचाकी क्रमांक एमएच २८ एए ६३९ वरून त्याचा मित्र सैयद इब्राहिम सैयद मुस्ताक यास सोडण्यासाठी माथणी फाट्यावर गेला असता तेथून परत गावाकडे जात होता. त्यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी मालवाहू क्रमांक एमएच २० सीटी १७५१ ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोहम्मद वसीम मो. जियाउल्ला हा गंभीर स्वरूपाने जखमी झाला.
त्यास तातडीने येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र सैयद इब्राहिम सैयद मुस्ताक (२१) रा, मिल्लत कॉलनी खामगाव याने गुरूवारी ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली.
पोलिसांनी उपरोक्त टाटा मॅजिकच्या चालकाविरूध्द कलम २७९, ३०४ अ, ४२७ भादंवि सहकलम १३४ मोवाका नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Two-wheeler rider killed in accident at khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.