कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: February 7, 2017 03:01 IST2017-02-07T03:01:33+5:302017-02-07T03:01:33+5:30

चिखली - जालना या राष्ट्रीय महामार्गावर अपघात.

Two-wheeler killed in a car-bike accident | कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

देऊळगावमही (बुलडाणा), दि. ६- चिखली - जालना या राष्ट्रीय महामार्गावर देऊळगावमही येथील मार्केटजवळ रविवार दुपारी कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला.
डिग्रस बु. येथील रहिवासी संदीप तोताराम पर्‍हाड कामानिमित्त बुलडाणा येथे गेला होता. तो बुलडाण्यावरून परत येत असताना समोरून येणार्‍या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. घटनास्थळी असलेल्या देऊळगावमही येथील नागरिकांनी धाव घेऊन संदीप पर्‍हाड याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र संदीप पर्‍हाडचा दुपारी चार वाजता मृत्यू झाला.

Web Title: Two-wheeler killed in a car-bike accident