बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: January 12, 2015 23:22 IST2015-01-12T23:22:58+5:302015-01-12T23:22:58+5:30
पूणे-मलकापूर बसच्या धडकेने दुचाकीवरील १ ठार तर १ गंभीर; मोताळा तालुक्यातील घटना.

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
मोताळा (बुलडाणा): पूणे-मलकापूर बसच्या धडकेने दुचाकीवरील १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जानेवारीचे सायंकाळी ६ वाजेदरम्यान मोताळा पासून तीन कि.मी. अं तरावरील परडा शिवारात घडली.
विटा भट्टीवर काम करणारे शिवाजी फकीरा दसरे (४0) रा.रोहिणखेड व जितेंद्र यमनेरे (३२) रा.त पोवन हे त्यांच्या कावासाकी बजाज मोटारसायकलने मोताळाकडून वाघजाळ फाट्याकडे जात अस ताना बुलडाणा-मलकापूर रोडवरील बोराखेडी येथील मौलानाच्या शेताजवळ बुलडाण्याकडून येणार्या पूणे-मलकापूर एस.टी.बस (क्र. एम.एच.४0-वाय-५६९२) गाडीचालक मंगलसिंह जोहरे याने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून समोरून येणार्या बजाज कावासाकी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील शिवाजी दसरे व जितेंद्र यमनेरे हे दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले. त्यामध्ये शिवाजी दसरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व जितेंद्र यमनेरे यांचे पायाला गंभीर दुखापत होवून दोघेही रस् त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी त्वरीत १0८ क्रमांकावर दूरध्वनी करुन अँम्बुलन्स बोलावली. दोन्ही जखमींना बुलडाणा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. दवाखान्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या शिवाजी दसरे यांचा मृत्यू झाल्याचे समज ते. तर दुसरे जखमी जितेंद्र यमनेरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.