दाेन दुचाकींची अमाेरासमाेर धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:35 IST2021-04-16T04:35:17+5:302021-04-16T04:35:17+5:30
रुईखेड मायंबा येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश हरिभाऊ गजघाणे हे १४ एप्रिल राेजी दुचाकीने औरंगाबादकडून आपल्या गावी ...

दाेन दुचाकींची अमाेरासमाेर धडक, एक ठार
रुईखेड मायंबा येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश हरिभाऊ गजघाणे हे १४ एप्रिल राेजी दुचाकीने औरंगाबादकडून आपल्या गावी येत हाेते़ दरम्यान, सातगाव फाट्यावर जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेच्या समोर धाडकडून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये रमेश गजघाणे व दुसऱ्या दुचाकीवरील रामेश्वर देवीदास खंबायतकर, गोपाल देवीदास खंबायतकर, परमेश्वर देवीदास खंबायतकर रा. रुईखेड टेकाळे आदी गंभीर जखमी झाले़ नागरिकांनी अपघातातील जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे रवाना केले़ मात्र यामध्ये रमेश गजघाणे यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व अपघातातील दुचाकी जमा केल्या आहेत.
याप्रकरणी अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता़ पुढील अधिक तपास धाड पोलीस करीत आहेत.