ट्रकची दुचाकीस धडक, सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी ठार; येळगाव फाट्यावरील घटना
By भगवान वानखेडे | Updated: October 9, 2022 16:00 IST2022-10-09T16:00:20+5:302022-10-09T16:00:41+5:30
बुलढाणा पोलीस दलातून मागील सहा महिन्यांपूर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्त घेतलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद काशीनाथ पाटील हे रविवारी सकाळी दुचाकीने येळगावकडे जात हाेते.

ट्रकची दुचाकीस धडक, सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी ठार; येळगाव फाट्यावरील घटना
बुलढाणा - भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी जागीच ठार झाले. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी येळगाव फाट्यावर सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली. विनोद काशीनाथ पाटील (५८) असे मृतकाचे नाव आहे.
बुलढाणा पोलीस दलातून मागील सहा महिन्यांपूर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्त घेतलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद काशीनाथ पाटील हे रविवारी सकाळी दुचाकीने येळगावकडे जात हाेते. दरम्यान, चिखलीवरून येणारा ट्रक क्रमांक (एमपी-०९ एचएच-८०४४) ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रुग्णालय परिसरात गर्दी होती.