लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई: बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईनजीक असलेल्या सैलानी बाबांच्या दर्ग्यावर आलेल्या भाविकांच्या वाहनास शॉर्टसर्कीटमुळे आग लागून दोन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. यात एक वाहन पुर्णत: जळून खाक झाले आहे. सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने लावण्यात आलेली असतानाच आता काही बंधनेही उठविण्यात आली आहे. त्यामुळे सैलानी येथे काही भावीक येत आहे. मात्र त्यांना बाहेरून परत पाठवले जात आहे. त्यानुषंगाने नांदेड जिल्ह्यातील शेळगाव छत्री येथून १४ भाविक एका वाहनाद्वारे सैलानी येथे आले होते. दरम्यान या भाविकांच्या वाहनास दुपारी तीन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. त्यात हे वाहन पुर्णत: जळून खाक झाले. दरम्यान या वाहनानजीकच असलेल्या अन्य एका वाहनालाही आग लागली. त्यामुळे दुसऱ्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.आग लागताच स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोवर ही आग भडकून एमएच-२६-एके-६९१४ क्रमांकाचे वाहन त्यात जळून खाक झाले. सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारा ही घटना घडली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या दुर्घटनेत जळालेले वाहन हे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येत असलेल्या शेळगाव छत्री येथील देविदास मारूती डोंगरे यांचे असल्याची माहिती समोर येत आहे.
शॉर्ट सर्कीटमुळे दोन वाहनांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:03 IST