डोणगावजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार
By Admin | Updated: June 15, 2017 19:25 IST2017-06-15T19:25:49+5:302017-06-15T19:25:49+5:30
डोणगाव : मेहकर ते डोणगाव मार्गावर डोणगावजवळ दोन किमी अंतरावर १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे.

डोणगावजवळ दोन ट्रकची धडक, दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : मेहकर ते डोणगाव मार्गावर डोणगावजवळ दोन किमी अंतरावर १५ जून रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जण ठार झाले असून, एक गंभीर जखमी आहे.
चंद्रपूरवरून मुंबईकडे लोखंड घेवून जाणारा ट्रक क्रं. डब्ल्यू बी - २३ - सी - ४७४८ व अहमदनगरहून नागपूरकडे जाणारा ट्रक कं. एमएच १६ बीसी ९७०१ या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बिहारमधील रविकुमार छापरा व अहमदनगर येथील संभाजी सुदाम चतूर हे दोघे जागीच ठार झाले. तसेच पंकज बाळासाहेब चतूर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. सदर अपघात राज्य महामार्गावर घडल्याने तब्बल तीन तास वाहनांच्या रांगा लागून होत्या. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आकाश शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जावून वाहतूक सुरळीत केली.