राजूर घाटात दोन ट्रकचा अपघात

By Admin | Updated: June 11, 2017 02:23 IST2017-06-11T02:23:27+5:302017-06-11T02:23:27+5:30

हनुमान मंदिराजवळील वळणावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला.

Two truck accidents in Rajur Ghat | राजूर घाटात दोन ट्रकचा अपघात

राजूर घाटात दोन ट्रकचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथून जवळच असलेल्या राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील वळणावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाले. ही घटना १0 जून रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.
तर या अपघातामुळे राजूर घाटात दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मलकापूर वरुन बुलडाण्याकडे येत असलेला ट्रक क्र. एच.आर.७४ ए-५८८१ हा आलू घेऊन आग्रा ते बेंगळुरू जात होता. बुलडाण्याकडे येत असताना राजूर घटातील हनुमान मंदिराजवळच्या वळणावर येताच बुलडाण्यावरून मलकापूरकडे जाणारा ट्रक क्र. एम.एच. २८-एबी ८३१८ ने जोरदार धडक दिली. या अपघातात दोही ट्रकचालक गंभीर जखमी झाले. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांनी त्यांना तत्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातामुळे राजूर घाटात दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वेळेवरच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. तर याच दरम्यान, बुलडाण्यावरून मलकापूरकडे जाणार्‍या कार क्र. एम.एच.१७ एबी ३६ ला मागून मलकापूरकडे जाणार्‍या क्रेन क्र. एम.एच.एम. ५२९३ ने धडक दिली. या अपघातात कारचा मागचा काच फुटल्याने कारचे नुकसान झाले. तसेच जोपर्यंत क्रेनचालकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत वाहने हलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Web Title: Two truck accidents in Rajur Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.