रेती वाहतुकीचे दोन टिप्पर उलटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:35 IST2017-05-24T00:35:45+5:302017-05-24T00:35:45+5:30
लोणार : लोणार-रिसोड मार्गावर २३ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान भरधाव धावणाऱ्या रेती टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उतरले.

रेती वाहतुकीचे दोन टिप्पर उलटले!
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : लोणार-रिसोड मार्गावर २३ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान भरधाव धावणाऱ्या रेती टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तहसील कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर एक टिप्पर रस्त्याच्या खाली उतरले, तर दुसरे टिप्पर देऊळगाव वायसानजीक पुलाच्या समोरच खाली घसरून शेतात शिरले. यात जीवितहानी झालेली नाही.
२३ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान लोणारहून रिसोडकडे भरधाव धावणाऱ्या रेती वाहतूक टिप्पर क्रमांक एम.एच. ३१ सीबी ७०४५ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तहसील कार्यालयाच्या जवळच पलटी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालक जावेद खान बिलावर खान व महादू सावसुंदर हे किरकोळ जखमी झाल्याने जमलेल्या नागरिकांनी त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर काही मिनिटांतच देऊळगाव वायसानजीक लोणारहून रिसोडकडे भरधाव जाणारे टिप्पर क्रमांक एम.एच. ०४ डी.के. ३९६३ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे टिप्पर गावाजवळ असलेल्या पुलावरून खाली घसरून शेतात घुसले. सकाळी शेतात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली; मात्र घाबरून गेलेल्या टिप्पर चालकाने तेथून पळ काढला.