दोन महिन्यांत दोन हजार कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:23+5:302021-04-08T04:34:23+5:30
कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू झाली आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ...

दोन महिन्यांत दोन हजार कोरोना तपासणी
कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू झाली आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २३ गावे येतात. या गावातील ताप, सर्दी, खोकला असलेल्या या रुग्णांची तपासणी केली असता साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा, शिंदी, गुंज, वरोडी, शेवगा जाहागीर, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, लिंगा, बाळसमुंद्र, राजेगाव, जागदरी, जनुना तांडा, शेंदुर्जन, कंडारी, भंडारी या सर्वच गावांत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांना बुलडाणा येथील कोरोना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. सध्या साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोरोना तपासणी सुरू असून, या तपासणीचा आता वेग वाढला आहे. आतापर्यंत येथे २ हजार ९७ नागरिकांनी कोरोना तपासणी केली आहे. त्यामध्ये २५७ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर १८४० निगेटिव्ह आले आहेत. वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, काही नागरिक हे निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येते.
१ हजार ४३१ जणांना दिली लस
साखरखेर्डा येथे लसीकरणाची मोहीमही जोरात सुरू आहे. सध्या साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १ हजार ४३२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर सवडद, शेंदुर्जन, शिंदी, राजेगाव येथेही लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना संक्रमण वाढल्याने नागरिकांनी कोरोना तपासणी करून स्वतःची आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस टोचून घ्यावी.
डॉ. संदीप सुरुशे, वैद्यकीय अधिकारी, साखरखेर्डा.