सतीफैलातून दोन चोरट्यांना अटक, शहर पोलिसांची कारवाई
By अनिल गवई | Updated: October 19, 2023 15:06 IST2023-10-19T15:05:56+5:302023-10-19T15:06:06+5:30
शहरात काही दिवसांपूर्वीच झालेल्या चोरीच्या घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली.

सतीफैलातून दोन चोरट्यांना अटक, शहर पोलिसांची कारवाई
खामगाव : शहरात काही दिवसांपूर्वीच झालेल्या चोरीच्या घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कॉटन मार्केटजवळील एका प्लायवूड सेंटरमध्ये १३ सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. तर ३ ऑक्टोबर रोजी आठवडी बाजारातील एका किराणा आणि स्वीटमार्टमध्ये चोरी झाली होती. दोन्ही चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले.
यामध्ये सती फैलातील धम्मा देवनारायण यादव २७, आणि आतीश शिवलाल जोहरे याला गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सतीफैलात एकच खळबळ उडाली. सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या चोरट्यांनाही लवकरच जेरबंद केल्या जाणार असल्याचा शहर पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत.