वाळू माफियांवरील कारवाईवरून दोन तहसीलदार आमने-सामने!
By Admin | Updated: March 25, 2017 02:33 IST2017-03-25T02:33:10+5:302017-03-25T02:33:10+5:30
हद्द निश्चित नाही; मंठा तहसीलदारांनी केली कारवाई.

वाळू माफियांवरील कारवाईवरून दोन तहसीलदार आमने-सामने!
किशोर मापारी
लोणार, दि. २४- वाळू माफियांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून जालना जिल्ह्यातील मंठा व लोणार तहसीलदार आमने-सामने आले आहेत. मंठा तहसीलदारांनी वाळूची वाहतूक करणार्यांवर हद्द सोडून कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
मंठा तालुक्यातील वझर सरकटे गावाच्या हद्दीतून अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी विदर्भातील २१ वाहने पूर्णा नदीपात्रात मंठा तहसीलदारांनी २0 मार्च रोजी पकडून सेवली पोलिसांच्या ताब्यात दिली होती. मात्र, ही कारवाई मंठा तहसीलदारांनी स्वत:ची हद्द समजून विदर्भातील चांगेफळ, भुमराळा तालुका लोणार यांच्या हद्दीत केली, अशी माहिती लोणारचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी दिली. अवैध वाळूचे उत्खनन वझर सरकटे हद्दीतून केल्याचा दावा करत मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी २३ मार्च रोजी रात्री ९ वा. सेवली पोलिसांकडे लिलावधारक व वाहनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विदर्भातील चांगेफळ, भुमराळा ता. लोणार येथील लिलावधारकांनी मंठा तालुक्यातील वझर सरकटे गावाच्या हद्दीतून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून विक्री सुरू केली होती. या अवैध वाळू उपसाला संबंधित लिलावधारकांना वझर सरकटे येथील पूर्णा काठावरील शेतकर्यांचे ह्यअर्थपूर्णह्ण सहकार्य मिळत असल्याने गौण खनिजाची सर्रास लूट सुरु होती. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर तहसीलदारांनी २0 मार्च रोजी वझर सरकटे हद्दीत २१ वाहने पूर्णा नदीपात्रात पकडली खरी; मात्र लिलावधारकांनी मंठा तहसीलदारांना हद्द सिद्ध करावी अन् मगच कारवाई करावी, असा आग्रह धरला. तर तहसीलदारांनी वाहने तहसील कार्यालयात घ्यावी, म्हणून आग्रह केल्याने वाळू लिलावधारक, वाहनधारक व तहसीलदार यांच्यात वाद झाला. तहसीलदाराने ग्रामस्थांच्या मदतीने सर्व वाहनाच्या टायरमधील हवा सोडून दिली अन् वाहने सेवली पोलिसांच्या ताब्यात दिली. हद्द नेमकी कोणाची? यावरून लोणार तहसीलदार व मंठा तहसीलदार यांच्यात एकमत होईना. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर कोणतीच कारवाई मंठा तहसीलदारांकडून करण्यात आली नव्हती. २३ मार्च रोजी दुपारी लोणार जि.बुलडाणा तहसीलदार सुरेश कव्हळे व मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, ही कारवाई मंठा तहसीलदारांनी स्वत:ची हद्द समजून विदर्भातील चांगेफळ, भुमराळा ता. लोणार यांच्या हद्दीत केली असून, तुमची हद्द भूमिअभिलेखमार्फत मोजून घ्या, असा सल्लाही लोणार तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांना दिला, तर अवैध वाळूचे उत्खनन वझर सरकटे हद्दीतून केल्याचा दावा करत मंठा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सेवली पोलिसांकडे लिलावधारक व वाहनधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.