दोन संशयीत युवकांना अटक
By Admin | Updated: September 8, 2015 02:17 IST2015-09-08T02:17:48+5:302015-09-08T02:17:48+5:30
गर्दीचा फायदा घेत, चोरीच्या उद्देशाने फिरणा-या दोन संशयीत युवकांना अटक; घाड पोलीसांची कारवाई.

दोन संशयीत युवकांना अटक
धाड (जि. बुलडाणा): स्थानिक एस.टी.बसस्थानकावर आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत, चोरीच्या उद्देशाने फिरणार्या दोन संशयीत युवकांना ७ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजेच्या सुमारास स्थानिक पोलिसांनी अटक केली. गावातील आठवडी बाजारात फिरणार्या या युवकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अजय आनंद शिंदे (२0) रा. मेहकर आणि शंकर मांगीलाल पाचीपांडव (२२) रा. सैलानी या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध कलम १0९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. धाड या गावात बाजार आणि एस.टी. बसस्थानकावर एकाच जागेवर असल्यामुळे चोरटे संधी साधून फायदा घेतात. यापूर्वीही धाड बसस्थानकावर मोबाइल चोरी, सोन्याची पोत लंपास आणि पाकीटमारीसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.