बुलढाणा : शेंदुर्जन येथे एकाच दिवशी दाेघांची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: May 24, 2023 15:26 IST2023-05-24T15:26:21+5:302023-05-24T15:26:38+5:30
येथील दाेघांनी २४ मे राेजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुलढाणा : शेंदुर्जन येथे एकाच दिवशी दाेघांची आत्महत्या
शेंदुर्जन (बुलढाणा) : येथील दाेघांनी २४ मे राेजी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दाेघांनी आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. विठ्ठल विश्वनाथ शिंगणे (वय ५५) व मयूर बाजीराव इंगळे (वय १९), अशी मृतांची नावे आहेत.
शेंदुर्जन येथील शेतकरी विठ्ठल शिंगणे यांनी राहत्या घरात टिनाच्या अँगलला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. शिंगणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे.
गावातीलच मयूर बाजीराव इंगळे या युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्याच्या पश्चात भाऊ, वहिनी व आई असा आप्त परिवार आहे. या प्रकरणी सारखरखेर्डा पाेलिस पुढील तपास करीत आहेत.