खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 10:40 AM2021-09-15T10:40:27+5:302021-09-15T10:40:37+5:30

Accident News : बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.

Two students killed in bus, two-wheeler accident near Khamgaon | खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन विद्यार्थ्यांचे खामगावजवळील लोखंडा शिवारात धरण फाट्याजवळ अपघातात निधन झाले. खामगावकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.
देऊळगाव घुबे येथील ऋषीकेश अरुण साखरे (वय २१) आणि शुभम नारायण काकडे (रा. रायपूर, ता. जि. बुलडाणा) हे दोन विद्यार्थी खामगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये १३ सप्टेंबरला आयटीआयचा पेपर सोडवण्यासाठी एमएच-२८-एक्स-८५३३ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. पेपर सोडविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दुचाकीने परतत असताना लोखंडा शिवारातील धरण फाट्याजवळ औरंगाबादहून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा (एमएच-२०-बीएल-१६९७) चालक एकनाथ शिवदास डोंगरे (३५, रा. औरंगाबाद) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून खामगावकडे तोंड करून उभ्या असलेल्या व भुसा भरलेल्या  एमएच-२८-एच-९८६० क्रमांकाच्या वाहनास धडक देत चालकाच्या बाजूने अेाव्हटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीलादेखील जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ऋषीकेश साखरे व शुभम काकडेला जबर मार लागला. 
विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेद्वारे डॉ. तकवीर अहमद प्राथमिक आरोग्य रुग्णालय, लाखनवाडा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two students killed in bus, two-wheeler accident near Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.