शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 21:51 IST

जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा २१ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मेहकर येथे मृत्यू झाला.

मेहकर : जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा २१ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मेहकर येथे मृत्यू झाला.जानेफळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश विश्वनाथ कंकाळ (५५) आणि लोणार पोलिस ठाण्याततील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंसतराव काळदाते (५७) अशी मृत्यू पावलेल्या पोलिस अधिकार्यांची नावे आहेत. दुर्देवी योगायोग म्हणजे दोघांवरही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात अगदी लगतच्याच कॉटवर उपचार करण्यात आले. मात्र नियतीला त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष भावला नाही. त्यातच उपचारादरम्यान या दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा मृत्यू झाला. २१ एप्रिल रोजी पहाटेदरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे दोघांनाही मेहकर येथील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या दोन्ही पोलिस अधिका-यांवर मेहकर आणि शेंदुर्जन येथे शासकीय इतमामात पोलिस प्रशासनाच्या वतीने अंत्यंस्कार करण्यात आले आहेत. बुलडाणा पोलिस दलातील हे दोन्ही अधिकारी अत्यंत अनुभवी होते. प्रकाश कंकाळ यांच्या पार्थिवावर शेंदुर्जन येथे त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वसंतराव काळदाते यांच्या पार्थिवावर मेहकर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलडाणा पोलिस दलाच्या कुटुंबातील दोन अत्यंत अनुभवी असे जवान आम्ही दुर्देवाने गमावले आहेत. एकाच वेळी एकाच हॉस्पीटलमध्ये लगतच्याच कॉटवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण पोलिस दल गंभीरपणे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे. दरम्यान, शासकीय मदत देण्याच्या अनुषंगाने पोलिस दलातर्फे शासकीय मदत देण्याची प्रक्रियाही शिघ्रगतीने पूर्ण करण्यात येईल.(डॉ. दिलीप भुजबळ पाटील, पोलिस अधीक्षक, बुलडाणा)

टॅग्स :Policeपोलिस