भरधाव बसची दुचाकीला धडकेत दोन जखमी
By Admin | Updated: November 14, 2014 00:00 IST2014-11-14T00:00:57+5:302014-11-14T00:00:57+5:30
मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात.

भरधाव बसची दुचाकीला धडकेत दोन जखमी
मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर लोणार-जळगाव एसटी बस ने दुचाकीस्वारास पाठीमागून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १.३0 वाजता दरम्यान घडली. जखमी दुचाकीचालकास औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. लोणार ते जळगाव खान्देश ही एस. टी. बस क्र.एमएच४0/८६३६ जळगाव खान्देशकडे जात असताना बसचालकाने समोर असलेल्या दुचाकी क्र.एमएच२0-बीपी-५४९ ला पाठीमागुन जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी बसच्या समोरील चाकाखाली अडकली तर दुचाकीवरील राजु वाघ रा. कुलमखेड आणि दुचाकीवर बसलेला दुसरा तरुण असे दोघे जखमी झाले. राजू वाघ याचे पायाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास उपजिल्हा रूग्णालयात प्रथमो पचार करुन पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविले. घटनेची माहिती मिळ ताबरोबर पोलिस उपनिरिक्षक सपकाळे, पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व वाहतुक सुरळीत केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.