बुलडाण्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:49 IST2019-10-05T14:48:42+5:302019-10-05T14:49:00+5:30
बुलडाणा मतदारसंघातंर्गत आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

बुलडाण्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा मतदारसंघातंर्गत आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डीएसडी चौकात ग्रामिण बँक कर्मचारी युनियनचा नामफलक झाकण्यात आला नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बुधवारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग शाखा अभियंता पुंडलिक जयवंता चेके यांनी तक्रार दिली. शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाने त्रिशरण चोकात होर्डींग्स लावलेले होते. त्यावर मोहन बंगाळे यांनी ठाकूर इंग्लिश क्लासेसचा बोर्ड लावलेला आढळला. याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.