बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 19:46 IST2021-01-06T19:46:13+5:302021-01-06T19:46:29+5:30
CoronaVirus News चिखली येथील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३ नवे पॉझिटिव्ह
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २५१ जणांच्या प्राप्त झालेल्या अहवालापैकी २२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, चिखली येथील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दरम्यान, बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सिंदखेड राजा येथील एक, पळशी येथील एक, खामगाव दोन, चिखली एक, दाभाडी एक, मोताला दोन, बुलडाणा दोन, नांदुरा एक, अवधा बुद्रूक एक, शेगाव नऊ, जवळपा एक, भोनगावमधील एकाचा समावेश आहे. दरम्यान, चिखली येथील ७० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत चिखली शहरात कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
दुरीकडे बुधवारी २९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये यासोबतच आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संधिग्दांपैकी ९२ हजार २८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.