दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरुद्ध कारवाई

By Admin | Updated: May 4, 2017 00:34 IST2017-05-04T00:34:17+5:302017-05-04T00:34:17+5:30

बुलडाणा : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरुद्ध ३ मे रोजी कारवाई केली.

Two lakh worth of money seized; Action against nine people | दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरुद्ध कारवाई

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरुद्ध कारवाई

बुलडाणा : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर धाडी टाकून १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ जणांविरुद्ध ३ मे रोजी कारवाई केली.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, या पथकाने साखरखेर्डा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शिवाजीनगर गावात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध छापे मारून ९ हजार १०० रुपयांच्या १३० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. साखरखेर्डा येथे अंकुश केवट हा वरली मटका खेळताना मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडून ६ हजार ७२५ रुपये रोख व २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण २६ हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच देऊळगाव मही येथे चार आरोपीच्या ताब्यातून ४६ हजार २०० रुपये किमतीचे देशी दारूचे १५ बॉक्स व नगदी २५ हजार ९००, असा एकूण ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या एका इसमास पकडून त्याच्या ताब्यातून १६ हजार रुपयांच्या देशी दारूच्या शंभर बाटल्या व १६ हजार ५०० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच अंबाशी फाट्याजवळ अवैधरीत्या दारू बाळगणाऱ्या दोन जणांना पकडून त्यांच्या ताब्यातून ७ हजार ७५४ रुपये किमतीच्या दारूच्या ५९ बॉटल व ९ हजार ४५० रुपयांच्या देशी दारूच्या ११८ बॉटल जप्त केल्या.

Web Title: Two lakh worth of money seized; Action against nine people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.