विविध अपघातांत दोन ठार; पाच गंभीर

By Admin | Updated: May 5, 2015 00:07 IST2015-05-05T00:07:26+5:302015-05-05T00:07:26+5:30

बुलडाणा जिल्ह्यात चार अपघात.

Two killed in various accidents; Five serious | विविध अपघातांत दोन ठार; पाच गंभीर

विविध अपघातांत दोन ठार; पाच गंभीर

बुलडाणा : जिल्ह्यात विविध चार अपघाताच्या घटनेत २ ठार तर ५ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलडाणा शहराजवळ असलेल्या मलकापूर रस्त्यावरील डॉल्फीन स्वीमींग पुलाजवळ मोटारसायकलीच्या अपघातात युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान घडली. या घटनेत शे.समीर शे. जमीर (वय २७) याचा मृत्यू झाला. अजहर चौधरी शे. मोहम्मत (वय ३0) हे जखमी झाले. बुलडाणा-चिखली रस्त्यावर ३ मे रोजी रात्री ८.३0 वाजता झालेल्या दुसर्‍या अपघाताच्या घटनेत कार-मोटरसायकलची समोरासमोर धडक होवून १ ठार तर १ गंभीर जखमी झाला आहे. घटनेतील मृतकाचे नाव राजेंद्र बळीराम मिरगे आहे. विलास दुतोंडे वय २६ रा. मातला गंभीर जखमी झाले. अपघाताची तिसरी घटना कोलवड परिसरात टायर फाटल्यामुळे क्रुझरचा अपघात झाला. या घटनेत दोन गंभीर जखमी झाले. यामध्ये सुभाष डुकरे, आशाबाई डुकरे गंभीर जखमी झाले. अपघाताची चवथ्या घटनेत बिबी येथील नदीपुलावर कन्टेनर व ट्रकची समोरासमोर धडक होऊन १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी १0 वाजता घडली. यामध्ये कंटेनरमधील क्लीनर मलविंदरसिंग हा जखमी झाला आहे.

Web Title: Two killed in various accidents; Five serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.