विविध अपघातात दोन ठार

By Admin | Updated: May 24, 2017 01:04 IST2017-05-24T01:04:29+5:302017-05-24T01:04:29+5:30

एक गंभीर : लोणार, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

Two killed in various accidents | विविध अपघातात दोन ठार

विविध अपघातात दोन ठार

बुलडाणा : सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात झालेल्या दोन विविध अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला.

साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अमडापूर-लव्हाळा रोडवर लोणी लव्हाळाजवळ ट्रॅक्टर व मोटारसायकलचा अपघात होऊन दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. मंगरुळ नवघरे येथील गणेश आनंदा काकडे हा लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी लव्हाळा भागात आला. त्याच्यासोबत श्याम सुधाकर सिरसाट या युवकाला घेतले होते. परिसरात लग्न पत्रिका वाटप करुन दोघेही रात्री ९.३० वाजता मोटारसायकल क्र.एम.एच.२८ ए.पी.७३१६ ने परत जात होते. लोणी शिवारात उंद्री येथून पाच ट्रॅक्टर मळणीयंत्र घेऊन वर्दडी वैराळ येथे येत असताना ट्रॅक्टर क्र.एम.एच.२८ ए.जे.५३१४ या ट्रॅक्टरचालकाने भरधाव ट्रॅक्टर चालवून मोटार सायकलला धडक दिली. ट्रॅक्टर मागील पेरणी यंत्राला जबर धडक लागल्याने पेरणी यंत्राचे फाळ पोटात शिरले आणि दोघेही घटनास्थळीच ठार झाले. उपरोक्त अपघाताची माहिती ठाणेदार ब्राम्हणे यांना मिळताच त्यांनी बिट जमादार संजय कोल्हे, राजेश मापारी, अरुण चव्हाण, सुयोग महापुरे हे घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ट्रॅक्टरचालक फरार झाला होता. त्याचा पाठलाग करून ट्रॅक्टरसह पोलीस स्टेशनला हजर केले. उमेश सुरेश काकडे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लोणार :
रेतीचे टिप्पर चुकविताना मालवाहन क्रमांक एम.एच.०५. ए.एम.३८४४ चा मंगळवारी अपघात होऊन रस्त्याच्या कड्यावरील निंबाच्या झाडावर आदळले. यामध्ये चालक नीलेश कळासरे हा गंभीर जखमी झाला असून, लोणार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे. सदर घटना लोणार ते रिसोड मार्गावरच मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. यामुळे संतप्त नागरिकांनी काही वेळासाठी रास्ता रोको केला.

Web Title: Two killed in various accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.