पळशी-झांशी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू, २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 17:20 IST2022-06-23T17:20:45+5:302022-06-23T17:20:57+5:30
Two killed, two injured in lightning strike : वीज पडून २ जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना २३ जून रोजी दुपारी २.३० वाजताच्यादरम्यान घडली.

पळशी-झांशी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू, २ जखमी
पळशी झांशी (बुलडाणा) : गाव शिवारात पाऊस सुरू असताना वीज पडून २ जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना २३ जून रोजी दुपारी २.३० वाजताच्यादरम्यान घडली.
पळशी झांशी गाव शिवारात शुभम हेलगे यांच्या शेतात विहीरीचे क्रेनव्दारे खोदकाम सुरू होते. यावेळी विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू असताना क्रेनवर काम करणारे संजय उत्तम मारोडे (वय ५५) व रवि संजय भालतडक ( वय ३५) या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पावसामुळे आपले अंगावरील कपडे ओले होवू नये याकरीता कपडे आणण्याकरिता गेलेले मंगेश मनोहर बाखरे व बंडु मधुकर मारोडे जखमी झाले. जखमींना गावातील लोकांनी संग्रामपूर येथील दवाखान्यात दाखल केले. तेथून त्यांना रूग्णवाहिकेव्दारे शेगावला रवाना करण्यात आले. संजय उत्तम मारोडे हे अल्पभूधारक असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, २ मुली आहेत. रवि संजय भालतडक यांच्यामागे १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा परिवार आहे