बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ६७६ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:21 AM2021-04-15T11:21:41+5:302021-04-15T11:21:54+5:30

Coronavirus in Buldhana : एकूण ३,४१८ जणांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती.

Two killed in Buldana district, 676 Corona positive | बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ६७६ जण कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ६७६ जण कोरोना पॉझिटिव्ह

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून ६७६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी एकूण ३,४१८ जणांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २,७४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी ६७६ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक १४६ तर त्या खालोखाल देऊळगाव राजा तालुक्यात १०७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. खामगाव तालुक्यात २९, शेगाव तालुक्यात ५८, चिखली तालुक्यात ३०, मेहकर तालुक्यात ८८, मलकापूर तालुक्यात ३४, नांदुरा तालुक्यात ६४, लोणार तालुक्यात १६, मोताळा तालुक्यात २३, जळगाव जामोद तालुक्यात १३, सिंदखेड राजा तालुक्यात ६८ याप्रमाणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात बुधवारी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान दोन जणांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये खामगाव शहरातील घाटपुरी रोडवरील ७५ वर्षीय पुरुष आणि नांदुरा येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांचा आकडा आता ३१५ झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार १२२ जण कोरोना बाधित झाले असून त्यापैकी ४२ हजार १२२ जण कोरोनामुक्त झाले आहे. बुधवारी ३४६ जणांनी कोरोनावर मात केली.

Web Title: Two killed in Buldana district, 676 Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.