सराफा दुकानातून दोन किलो चांदी लंपास
By Admin | Updated: July 31, 2014 01:27 IST2014-07-31T01:02:11+5:302014-07-31T01:27:46+5:30
शेगाव येथील घटना: महिला चोरांची टोळी सीसी कॅमेर्यात कैद.

सराफा दुकानातून दोन किलो चांदी लंपास
शेगाव: ज्वेलर्सच्या दुकानामध्ये टोळक्याने जावुन दुकानदाराचे लक्ष विचलीत करुन सोन्या- चांदीचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये शेगावात वाढ झाली आहे. आज बुधवारी पुन्हा एका महिलांच्या टोळीने ज्वेलर्सच्या दुकानातील दोन किलो चांदीचे दागीने लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली. शहरातील मेन रोड वरील तुलसी ज्वेलर्समध्ये आज सकाळी पाच महीलांचे टोळके ज्यामध्ये दोन मुली व एक आठ वर्षीय बालीकेचा समावेश अशांनी प्रवेश करुन दुकानदाराला दागीने दाखविण्याचे सांगितले. दुकानदार ते दागीने काढण्यामध्ये व्यस्त असतांना एका १५ वर्षीय मुलीने काऊंटर ाधील ड्रॉप उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदार त्याच ठिकाणी उभा राहील्याने या महीलांचा प्रयत्न फसला. त्यानंतर या टोळक्याने कुठलीही वस्तु विकत न घेता त्यांनी बाजुच्याच मयुर ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन दुकानदार वर्मा यांना दागीने दाखविण्याचे सांगितले. वर्मा हे व्यस्त झाल्याचे पाहुन महिलेच्या इशार्या वरुन आठ वर्षीय बालीकेने दुकानातील आलमारीमध्ये ठेवलेला चांदीच्या जोडव्यांचा डबा उचलुन महीलेकडे दिला. व यानंतर सर्वांनी तेथुन पोबारा केला. ही बाब काही वेळानंतर वर्मा यांच्या लक्षात आली. सदर दोन्ही घटना ह्या सि.सि.कॅमेर्यामध्ये कैद झाल्या असून या दृष्यांमध्ये महिला ह्या चांगल्या घराण्यातील असल्याचे पेहरावावरुन दिसुन येते. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी शेगाव पोलीसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. शेगाव शहरात यापूर्वी सुध्द अशा चोरट्या महिलांची टोळी पोलिसांनी पकडली होती. सध्या शहरात अशा प्रकारच्या चोर्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. त्यासाठी नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.