दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 19:50 IST2017-07-31T19:46:21+5:302017-07-31T19:50:54+5:30

Two hundred women donated 1.25 lakh balpatra! | दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!

दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!

ठळक मुद्देदुसरा श्रावण सोमवारजागृती आश्रमात धार्मिक कार्यक्रमजागृती परिवाराचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव  (बुलडाणा): श्रावणातील दुसºया सोमवार निमित्त खामगाव येथून जवळच असलेल्या जागृती आश्रमात भगवान शिवशंकराला तब्बल १.२५ लक्ष बेलपत्राचा अभिषेक केला.
जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांच्या संकल्पनेतून  शेलोडी येथे बाराज्योर्तीलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात  भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान, शेवटच्या श्रावण सोमवारी जागृती आश्रमाती सिद्धवृक्षाखालील जागृत नर्मदेश्वराच्या पिंडीवर जागृती महिला भक्त मंडळाच्या े शंभरावर महिलांनी प.पू.शंकरजी महाराजांच्या मार्गदर्शनात  विशेष महापूजा करून १.२५ बेलपत्र अर्पण केले. यावेळी जागृती परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सव्वाचार लक्ष ओम नम: शिवाय मंत्राचा जपही करण्यात आला.

Web Title: Two hundred women donated 1.25 lakh balpatra!