क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 27, 2017 02:30 IST2017-03-27T02:30:06+5:302017-03-27T02:30:06+5:30

खामगाव तालुक्यातील अटाळी येथे हाणामारी झाल्याची घटना.

Two groups clash over trivial reasons; Filed the complaint | क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल

क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी; गुन्हा दाखल

खामगाव, दि. २६- क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील अटाळी येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटातील इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी तौसिफ अहमद म. इक्बाल देशमुख (वय ३२) रा.अटाळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मो. मिहान देशमुख, मो. फरहान देशमुख, म.सोहेल देशमुख, सलिमोद्दिन मुनीरोद्दिन देशमुख आदींविरुद्ध कलम ३0७, १४३, १४७, १४८, १४९, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर फरहान जमीरुद्दिन देशमुख (वय ३१) रा.अटाळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून म.तौसीफ म.इक्बाल देशमुख, म.अकलाल म.इक्बाल, म.इक्बाल गुलाम अहमद, म.जावेद गुलाम, म.अशरफ म.जावेद, म.नईम गुलाम आदी आरोपींविरुद्ध कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

Web Title: Two groups clash over trivial reasons; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.