दोन मुलींना फूस लावून पळविले!
By Admin | Updated: March 26, 2016 02:18 IST2016-03-26T02:18:38+5:302016-03-26T02:18:38+5:30
मोताळा तालुक्यातील घटना.

दोन मुलींना फूस लावून पळविले!
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील इब्राहीमपूर येथील दोन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना २४ मार्चच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मोताळा तालुक्यातील इब्राहीमपूर येथील एका इसमाने बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजय दिलीप ठाकरे रा. वर्हाडशिंगी ता.भुसावळ जि. जळगाव व अनिल शंकर बरडे रा. इब्राहीमपूर ता. मोताळा या दोघांनी संगनमत करून फिर्यादीची मुलगी व पुतणीस लग्नाचे आमिष दाखवून २४ मार्च रोजी पळवून नेले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उत्तम सीताराम बरडे रा. इब्राहीमपूर यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ विनोद शिंदे करीत आहेत.