दोन जुगार अड्ड्यांवर छापा; आठ अटकेत

By Admin | Updated: July 2, 2017 09:04 IST2017-07-02T09:04:02+5:302017-07-02T09:04:02+5:30

आठ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले.

Two gambling bases printed; Eight accused | दोन जुगार अड्ड्यांवर छापा; आठ अटकेत

दोन जुगार अड्ड्यांवर छापा; आठ अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे नापोकाँ देवकुमार तायडे यांनी शिरजगाव देशमुख येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून राजू धोंडु खंडेराव, विलास निरंजन खंडेराव, प्रमोद माणिकराव भोजने, सूर्यभान जंगलुमन खंडेराव, संतोष नारायण दाभाडे, विठ्ठल गजानन उमाळे व उत्तम खंडेराव सर्व रा. शिरजगाव देशमुख यांना रंगेहात अटक केली, तसेच एएसआय शेख रब्बानी यांनी कोलोरी शिवारात गजानन रामकृष्ण क्षीरसागर यास वरलीचे आकडे घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी उपरोक्त आठ जणांविरुद्ध कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Two gambling bases printed; Eight accused