टिप्परच्या धडकेत शेगावकडे येणारे दोन भाविक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:20 IST2020-02-14T23:20:23+5:302020-02-14T23:20:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव: श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवासाठी अकोटवरून येणाऱ्या पायदळ वारीत सहभागी दोन युवक टिप्परच्या धडकेत ...

टिप्परच्या धडकेत शेगावकडे येणारे दोन भाविक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवासाठी अकोटवरून येणाऱ्या पायदळ वारीत सहभागी दोन युवक टिप्परच्या धडकेत ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारीरोजी रात्री १०.१५ वाजता घडली.
अकोट येथून शेगावसाठी पायदळ दिंडी येत होती. यामध्ये पळसोद येथील विशाल पाटेकर (वय २५) व शाम निवाणे (वय २५) हे दोघे सहभागी झाले. लोहारानजीक असलेल्या मदरशाजवळ अज्ञात टिप्परने विशाल संजय पाटेकर व शाम बाळू तिवाणे या दोघांना मागून धडक दिली. नागरिकांनी त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पुढील तपास उरळ पोलिस करीत आहेत.