शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:17 IST

जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मुळे लग्न समारंभ रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सोने खरेदी पूर्णपणे बंद असल्याने जिल्ह्यातील व्यावसायिकांना खूप मोठी झळ पोहचली आहे. परिणामी सराफा व्यवसायात दरवर्षी होणारी जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दरवर्षी सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर लग्न समारंभाला सुरुवात होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. सुरुवातीला एकही रुग्ण नसलेल्या महाराष्ट्रात मार्च महिन्यात पहिला ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि सर्वांच्या चिंतेत वाढ झाली. यानंतर या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून राज्यातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा दोन हजारांच्या वर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात २३ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ऐन सीझनमध्येच ‘लॉकडाउन’ आल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी लग्न समारंभ तूर्तास रद्द करण्यात आले आहेत.

लग्न समारंभ म्हटले की, सोने खरेदीला प्राधान्यक्रम दिल्या जातो. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. काही ठिकाणी सोने खरेदी न करताच अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडले. अनेकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत वाट पाहण्याचा मार्ग निवडला आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम सराफा व्यवसायावर झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी लग्न समारंभाच्या पृष्ठभूमीवर जवळपास २ कोटी रुपयांची उलाढाल होत असते; मात्र यावर्षी ही उलाढाल पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यावसायिकांना खूप मोठी आर्थिक झळ पोहचली आहे.

‘कोरोना’ चा वाढता धोका पाहता राज्य शासनाने ‘लॉकडाउन’मध्ये वाढ केली आहे. सुरुवातील १४ एप्रिलपर्यंत असलेले ‘लॉकडाउन’ आता ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. ‘लॉकडाउन’ उठल्यानंतर बाजारपेठ सुरू होणार असली तरी, सोने खरेदीसाठी कोणीही येणार नसल्याने परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.- दीपक वर्मा,सराफा व्यावसायिक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGoldसोनंCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस