दोन काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी

By Admin | Updated: January 20, 2015 00:50 IST2015-01-20T00:50:19+5:302015-01-20T00:50:19+5:30

चिखली, मलकापूर, नांदुरा नगरपालिका पोटनिवडणूकीतील चित्र.

Two Congress and BJP in one place | दोन काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी

दोन काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी

*मलकापुरात सुनील बगाडे विजयी
मलकापूर येथील न.पा. च्या प्रभाग क्र.७ (ड) आंबेडकर नगर प्रभागमध्ये रिक्त झालेल्या एका जागेसाठी १८ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुनील रामदास बगाडे हे ११३ मतांनी विजयी झाले. तर भाजपाचे कुणाल अशांतभाई वानखेडे, शिवसेनेचे मुकेश लालवानी यांना पराभव पत्करावा लागला.नांदुरा येथील प्रभाग ४ (ड) च्या रिक्त जागेसाठी १८ जानेवारी रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या *काँग्रेसचे अ. मोबीन विजयी
चिखली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या एका जागेसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अ. मोबीन अ. मतीन हे ६४0 मतांनी विजयी झाले. नगर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष हाजी नईम खा यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त जागेसाठी १८ जानेवारी रोजी मतदान झाले. यामध्ये ५ हजार १४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर निवडणूक रिंगणात काँग्रेसकडून अ. मोबीन अ. मतीन, भाजपाकडून प्रकाश सोनोने व अपक्ष प्रकाश सपकाळ हे तीन उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे अ. मोबीन अ. मतीन यांनी २ हजार ७0६ मते घेऊन विजयी झाले. भाजपाचे प्रकाश सोनोने यांना १ हजार ८४६ तर अपक्ष उमेदवार प्रकाश सपकाळ यांना केवळ ४0८ मतांवर समाधान मानावे लागले.
       फरजानाबानो या २१८३ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष शीलाताई सुरेश पेठकर यांचा पराभव केला. पेठकर यांना १५७६ मते मिळाली. येथील प्रभाग ४ (ड) च्या नगरसेविका यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी १८ जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ५७१७ पैकी ३८३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये भाजपाच्या फरजानाबानो यांना २१८३ तर अपक्ष शीलाताई पेठकर यांना १५७६ मते मिळाली. तर ७६ मतदारांनी नोटाचा वापर केला. मतमोजणी आज नांदुरा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

Web Title: Two Congress and BJP in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.