भरधाव कारची दोन दुचाकींना धडक

By Admin | Updated: November 8, 2014 23:46 IST2014-11-08T23:46:56+5:302014-11-08T23:46:56+5:30

चिखली तालुक्यातील अपघातात चार जण गंभीर.

Two car bikes hit the car | भरधाव कारची दोन दुचाकींना धडक

भरधाव कारची दोन दुचाकींना धडक

चिखली (बुलडाणा): भरधाव वेगात बुलडाणाकडे जाणार्‍या इंडिगो चालकाने २ दुचाकींना जबर धडक दिल्याने दोन वेगवेगळ्या दुचाकींवरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिखली-बुलडाणा मार्गावरील राऊतवाडीनजिक घडली. या अपघातातील गंभीर जखमींना बुलडाणा व औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
केवल किशोर नाके रा.चिखली हा आपल्या ताब्यातील इंडिगो क्र.एम.एच.१४ ए.ई.९३९७ ने भरधाव वेगाने चिखलीहून बुलडाणाकडे जात असताना राऊतवाडीनजिक असलेल्या स्मशानभूमीजवळ समोरून येणार्‍या दुचाकी क्र.एम.एच.२८ क्यू.४0११ व एम.एच.२८ ए.एच.२४७४ या दोन दुचाकींना जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील भिका शंकर ढोरे व संजय अर्जून गवई दोघे रा.भोरसाभोरसी व प्रवीण सरदार रा.बाबुळखेड ता.मेहकर व अशोक आराख रा.ऐनखेड यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर भिका ढोरे व संजय गवई या दोघांना औरंगाबाद तर प्रवीण सरदार व अशोक आराख यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले.

Web Title: Two car bikes hit the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.