सारशिव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:27+5:302021-06-17T04:24:27+5:30

सारशिव येथील सुरेश संपत शेगोकार यांच्या घराचा मागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले ...

Two burglaries in one night at Sarshiv | सारशिव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

सारशिव येथे एकाच रात्री दोन घरफोड्या

सारशिव येथील सुरेश संपत शेगोकार यांच्या घराचा मागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी तीन लाख रुपये, एक तोळ्याचे सोने, गहू पोथ यासह अन्य दागिने असा तीन लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विजय साहेबराव मोरे यांच्या घरातील रोख एक हजार रुपये व स्टेट बँकेचे चेक चोरट्यांनी लंपास केले. उमेश ढोणे यांचेही घर चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जानेफळचे ठाणेदार राहुल गोंधे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. सोबतच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सध्याचा पेरणीचा हंगाम पाहता शेतकऱ्यांनी बियाणे, खतांसाठी पैशांची तजवीज करून पैसा घरी आणून ठेवला आहे. त्यावरच चोरट्यांनी हात साफ केला. या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Two burglaries in one night at Sarshiv