शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात दोन बोगस डॉक्टर ताब्यात, हॉटेलात करीत होते उपचार

By अनिल गवई | Updated: April 3, 2023 13:53 IST

खामगाव शहरातील विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू होते.

खामगाव: शहरातील एका हॉटेलात रूग्णांवर उपचार करणार्या दोन डॉक्टरांना शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. याकारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव शहरातील विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू होते. वात आणि असाध्य रोगाच्या उपचारासाठी जमलेल्या रूग्णांवर उपचार सुरू असताना सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलीसांच्या मदतीने उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने दोन डॉक्टरांसह येथून डॉक्टरांनी मोठ्याप्रमाणात औषधसाठा जप्त केला. 

दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस सुत्रानुसार महावीर सिंह आणि अरविंद कुमार अशी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पंकज सपकाळे आणि शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील रूग्ण अधिकवातविकार आणि इतर असाध्य आजारावर उपचारासाठी हे डॉक्टर येथे महिन्यातून दोन वेळा येत होते. दरम्यान, सोमवारी तक्रारीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी शहरासोबतच ग्रामीण भागातील रूग्ण येथे मोठ्याप्रमाणात उपचारासाठी येत होते.

नावांमध्ये तफावतयाठिकाणी डॉक्टरांकडून वाटण्यात आलेल्या पत्रकामध्ये वेगळी आणि प्रत्यक्षातील डॉक्टर वेगळे असे विरोधाभासी चित्र पोलीस कारवाईत समोर आले. त्यामुळे पोलीस उपलब्ध दस्तवेजानुसार आरोपींच्या नावाची खात्री करीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा