दोन दुचाकींची समोरासमोर धडक

By Admin | Updated: June 27, 2016 02:27 IST2016-06-27T02:27:33+5:302016-06-27T02:27:33+5:30

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक गंभीर जखमी.

Two bikes hit face to face | दोन दुचाकींची समोरासमोर धडक

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

मोताळा (जि. बुलडाणा): दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर, तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना २५ जूनच्या रात्री कोथळी-पिंपळगाव नाथ मार्गावरील निमखेडीजवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील एका जखमीवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील रामगाव तांडा येथील विशाल बख्तार पवार व राजेश पवार हे दोघे मोताळा येथून शनिवारी रात्री दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, निमखेडी येथील पांडुरंग जगदेव बिचकुले आपल्या नातवासह दुचाकीने धामणगाव देशमुखकडून घराकडे येत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास निमखेडी-धामणगाव देशमुख मार्गावर दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात विशाल पवार गंभीर जखमी झाला, तर राजेश पवार व दुसर्‍या दुचाकीवरील पांडुरंग बिचकुले व त्यांचा नातू असे तिघे जण जखमी झाले. अपघातात दोन्ही मोटारसायकलींच्या समोरील भागाचा चुराडा झाला. ही माहिती कळताच रामगाव येथील छगन धाबे, संतोष भिडे, दरबार मेंडकर, विजय मेंडकर, धनराज माळी आदींनी तत्काळ रूग्णवाहिका घटनास्थळी बोलावून जखमींना बुलडाणा येथे उपचारासाठी पाठविले. जखमीपैकी विशाल पवार हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी बोराखेडी ठाण्यात कोणत्याही गुन्हय़ाची नोंद नव्हती.

Web Title: Two bikes hit face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.