बिबट्या, रोहीच्या गूढ मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:12 IST2017-07-20T00:12:25+5:302017-07-20T00:12:25+5:30

जानेफळ : स्थानिक मळी शेतशिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्या व रोहीच्या गुढ मृत्यूप्रकरणी वन विभागाने १९ जुलै रोजी दोघांना ताब्यात घेतले.

The two arrested on the mysterious death of Leopards, Rohi | बिबट्या, रोहीच्या गूढ मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

बिबट्या, रोहीच्या गूढ मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : स्थानिक मळी शेतशिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्या व रोहीच्या गुढ मृत्यूप्रकरणी वन विभागाने १९ जुलै रोजी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्या दोघांनाही मेहकर न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जानेफळ येथील श्याम मांगीलाल गट्टाणी यांच्या मळी शिवारातील गट क्र.१०५ मधील शेतात नाल्याकाठी १६ जुलै रोजी बिबट्या व रोही कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे बिबट्या व रोहीच्या मृत्यूबद्दल परिसरात एकच खळबळ उडाली होती. बिबट्याच्या पोटावर जळाल्याचा मोठा काळा चट्टा असल्याने सदर बिबट्याचा विद्युत शॉकने मृत्यू झाल्याचा हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे वन विभागाने याबाबत तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, १९ जुलै रोजी माळेगाव येथील सुरेश प्रल्हाद लोखंडे (३४) व किशोर आश्रू गाढवे (२८) या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उभय दोघांनाही मेहकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: The two arrested on the mysterious death of Leopards, Rohi