शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:27 IST

मलकापूर येथे आणण्यात येत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा  गुटखा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.

बुलडाणा: भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टीकच्या कॅरेटच्या आड छुप्या पद्धतीने कर्नाटकमधून बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आणण्यात येत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा  गुटखा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून प्रकरणी मलकापुरातील दोन जणांना अटक केली आहे.प्रत्यक्षात १४ मे रोजी रात्री औरंगाबाद येथील बीड बायपासवर झाल्टा फाट्यानजीक ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी औरंगाबाद येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्नाटक राज्यातून सोलापूर-अहमदनगर मार्गे औरंगाबाद बीडबायपासवरून जालन्याच्या दिशेने एमएच-२८-बी-८१३२ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नेण्यात येत होता. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर १४ मे रोजी झाल्टा फाट्यानजीक हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सय्यद, अकिल सय्यद अय्युब (३४, रा. सायकलपूरा) आणि शेख रफीक शेख कदीर (३५, रा. पारपेठ) यांना अटक करण्यात आली आहे. मलकापूरमधील पारपेठ भागातील पांढरी प्लॉट येथे राहणाºया अतिकूर रहेमान शफिकूर रहेमान याच्या सांगण्यावरून सोलापूरवरून जालना येथे हा गुटखा नेण्यात येत होता, असे उपरोक्त दोन्ही आरोपींनी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना तपासादरम्यान, सांगितले असल्याची माहिती आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तस्करीसाठी भाजीपाल्याच्या कॅरेटचा वापरआरोपींनी ट्रकमध्ये भाजीपाला भरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या हिरव्या व निळ््या रंगाच्या प्लास्टीकच्या २५५ कॅरेटच्या आड ५० गोणपाटामध्ये ३०० गोण्यात हा ९० लाखांचा गुटखा ठेवला होता, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली. प्रकरणी कारवाईदरम्यान हा संपूर्ण एक कोटी तीन लाख ३५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी