पादचा-यांना धडक देऊन ऑटो उलटला

By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30

संग्रामपूरनजीक असलेल्या सावळा फाट्याजवळ अपघात

Turning the pedestrians back by themselves | पादचा-यांना धडक देऊन ऑटो उलटला

पादचा-यांना धडक देऊन ऑटो उलटला

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : जळगाव जामोद येथून येत असलेल्या प्रवासी ऑटोने तीन पादचार्‍यांना धडक दिली. त्यानंतर हा ऑटो जागीच उलटल्याची घटना संग्रामपूरनजीक असलेल्या सावळा फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी घडली. निंभोरा येथील गणेश खंडारे हा आपल्या प्रवासी अँपे या ऑटोमध्ये भाजीपाला घेऊन जळगाव येथून वरवटकडे जात होता. दरम्यान, ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेने जात असलेल्या तीन पादचारी मजुरांना धडक दिली. यामध्ये चांगेफळ येथील वंदना श्रीकृष्ण कांडलकर वय ३0, श्रीकृष्ण कांडलकर ३५ गंभीर तर संतोष प्रल्हाद बुंदे वय ३0 रा.निंभोरा किरकोळ जखमी झाले. यामधील वंदना श्रीकृष्ण कांडलकर गंभीर जखमी असल्यामुळे तिला प्रथम वरवट ग्रामीण रुग्णालयात तर पुढील उपचाराकरिता शेगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Turning the pedestrians back by themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.